गर्भसंस्कार - काळाची गरज
गर्भसंस्कार किंवा गर्भाधानसंस्कार हे सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. काळाच्या ओघात गर्भसंस्कारविषयी ची महती कमी होत गेली व आजकालच्या आधुनिक युगात गर्भसंस्कार हे समाजाला दाखवण्यापुरते किंवा फॅशन म्हणून केले जातात. गर्भसंस्काराबद्दल समाजात जनजागृती होताना सहसा दिसत नाही. याचे कारण गर्भसंस्काराची गहणता समाजाला समजली नाही. काही जणांकडून मी ऐकले व पाहिले आहे की पुस्तक वाचुन, यु-ट्यूबर काही पाहून किंवा काही दिवस एखाद्या गर्भसंस्कार केंद्रात जायचे व तिथे काही दिवस राहिले की आपले गर्भसंस्कार पुर्ण...